हीरकमहोत्सवोत्तर महाराष्ट्राचे गुणगान करताना, शोषित-पीडित-वंचितांना विकासाच्या प्रवाहातील सन्मानाचे जगणे मिळवून द्यावे लागणार आहे!

राज्याच्या निर्मितीचा जागर करताना लालजी पेंडसे यांच्या ‘महाराष्ट्राचे महामंथन’ या ग्रंथाचे स्मरण अपरिहार्य आहे. शेतकरी कामगार चळवळीचे नेतृत्व करणारे लालजी पेंडसे लेखक, समीक्षक आणि पत्रकार होते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या प्रारंभापासून या राज्याच्या स्थापनेपर्यंतच्या चळवळीचे ते एक साक्षीदार होते. त्यांनी लिहिलेला या चळवळीचा इतिहास म्हणजे ‘महाराष्ट्राचे महामंथन’ हा ग्रंथ होय.......